BEED24

धक्कादायक… पती पत्नीची आत्महत्या; केज तालुक्यातील घटनेने खळबळ.

केज दि.21 जुलै – गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या कारणांने लोक मरण जवळ करत असल्याचे दिसत आहे. केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे अशीच एक पती पत्नीने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

(Shocking … husband wife suicide; Excitement over the incident in Kaij taluka.)

केज (Kaij) तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे मंगळवारी दि.20 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान एका महिलेने आत्महत्या (suicide) केली. या महिलेचा पती आकाश धेंडे यानेही रात्री 10 ते 11 च्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली समोर आली. सदरील आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदरील घटनेची माहिती केज पोलिसांना (Police) मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. या घटनेचा केज पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत. सदरील घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

Exit mobile version