कुमारीका पुजेसे नकार देणाऱ्या मुलीकडून धक्कादायक माहिती; बीड जिल्ह्यात आणखी एक बलात्कार.

बीड दि.13 मे – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून आरोपीवर दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील उसतोडणी करणारी एक टोळी कर्नाटकमध्ये काम करून माजलगाव तालुक्यातील टालेवाडी तांडा येथे 16 एप्रिल रोजी कामासाठी आली होती. टालेवाडी शिवारातील एका उसाच्या फडात सदर टोळीकडून ऊस तोडणीचे काम सुरु होते. या दरम्यान, ट्रॅक्टर चालक पमू कुरेने टोळीतील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. सदरील प्रकाराची वाच्यता केल्यास, कोणाला सांगितले तर तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी ट्रॅक्टर चालक पमू कुरे याने मुलीला दिली.

गुरुवारी (दि.12) मुलीच्या घरी देवीची कुमारिका पूजा होती. यावेळी मुलीच्या आईने मुलीस पुजेसाठी बोलावले मात्र मुलीने पूजा करण्यास नकार दिला. मुलीच्या नकारामुळे आईने जाब विचारला असता मुलीने 16 एप्रिल रोजी टालेवाडी तांडा येथील शेतात ट्रॅक्टर चालक पमु कुरे याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावार अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. सदर प्रकार ऐकताच आईला धक्का बसला.

यानंतर पिडीतेच्या आईने थेट दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून ट्रॅक्टर चालक पमु कुरे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आईने दिलेल्या फिर्यादीवरुन बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, बलात्कार, ॲट्रॉसिटी अशा विविध कलमाअंतर्गत कुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत करत आहेत.

( Shocking information from a girl who refuses to marry a virgin; Another rape in Beed district. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!