पुजा चव्हाण प्रकरणात धक्कादायक माहिती…. दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

बीड दि.१७- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) तपासासाठी परळी येथे दाखल झालेल्या पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली असून पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि अन्य एका तरुणांची देखील चौकशी केल्याची चर्चा आहे. यवतमाळ येथे गेलेल्या पोलिस पथकाला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद असल्याची धक्कादायक माहिती आढळून आली असून याचा कसुन तपास सुरु आहे.
परळी येथील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर प्रकरणाने राजकीय रुप घेतले. सोशल माध्यमातून या प्रकरणाने अक्षरशः धुमाकूळ माजवल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलीस (Police) चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन पथके तैनात करून बीड, यवतमाळ आणि तिसरे पुण्यात पाठवले होते. बीडला आलेल्या पोलिसांनी परळी येथे जाऊन अरुण राठोड (Arun Rathod) आणि पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाशी चर्चा करत माहिती घेतली. तसेच पूजाशी निगडित दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आणखी मोठी माहिती समोर आली आहे. यवतमाळला रवाना झालेल्या पोलिस (Police) पथकाला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण (Pooja Chavan) आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर ह्या प्रकरणात अरूण राठोडचे (Arun Rathod) असलेलं कनेक्शन यावरुन पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मंत्री आणि अरूण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लीप आहे त्यातही प्रेग्नंसीबाबत चर्चा होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. पूजा अरूण राठोड ही ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचे नोंदीत आढळून आले आहे.