धक्कादायक… कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच अनेक जण बेपत्ता; माजलगाव मधील घटना

माजलगाव दि.17 मार्च – प्रशासनाने व्यापाऱ्यांना अँटीजन (Antigen) चाचणी बंधनकारक केल्यानंतर माजलगाव शहरातील गणपती मंदिर व सोळंके महाविद्यालयात अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली. मंगळवार दि.16 रोजी अँटिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) निघालेले अनेक जण कोणालाही न सांगता पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोग्य विभागाला (Health department) याबाबत माहिती मिळताच शोधाशोध सुरु करण्यात आला.
(Shocking … Many disappeared as soon as the corona test came positive; Incidents in Majalgaon)
जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अँटिजन (Antigen) चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे माजलगाव (Majalgoan) शहरात मागील चार दिवसांपासून अँटिजन चाचणीसाठी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. यात अनेक जण पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी गणपती मंदिरात चाचणीनंतर पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण कोणालाही न सांगता फोनवर बोलण्याच्या निमित्ताने निघून गेल्याची घटना घडली.
अनेकांनी या रुग्णांस दुचाकीवरुन जाताना पाहिले मात्र, त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही. हेच नाही तरा सदरील पॉझिटिव्ह रुग्ण दिवसभर भर रस्त्यावर ते फिरताना दिसून आले. या प्रकाराचा मात्र आरोग्य विभागाला थांगपत्ताही लागला नाही. आरोग्य विभागाच्या (Health department) कर्मचाऱ्यांसमोर पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने व ते भररस्त्यावर फिरत असल्याने त्यांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
माजलगाव (Majalgoan) शहरात मागील तीन दिवसांत १,६८० व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात ८७ व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचणीचा शेवटचा दिवस असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली. जे पॉझिटिव्ह रुग्ण निघून गेले असतील, त्याबाबत व्यापारी संघास कळविले आहे. त्यांना त्या रुग्णांस परत पाठविण्याबाबत सांगितले आहे. ते रुग्ण परत न आल्यास पोलिसांना सांगून आणण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी माध्यमांना दिली आहे.