पाच राज्याचे धक्कादायक निकाल; सुरुवातीलाच सर्व एक्झिट पोल फेल….

न्यूजरुम दि.10 मार्च – देशातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Elections) मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच धक्कादायक निकाल हाती येत आहेत.

( Shocking results of five states; Initially all exit polls failed …. )

सकाळी 9 वाजता देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh) 403 पैकी 289 जागांचे कल हाती आले आहेत. यात भाजपा 165 जागावर, समाजवादी 114, बसपा 4 काँग्रेस 3 तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत.

पंजाबमध्ये (Panjab) 117 पैकी 86 जागांचे कल हाती आले आहेत. यात आप 44, काँग्रेस 30, अकाली 9 तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी व नवज्योतसिंग सिध्दू व कॕ. अमरींदरसिंग पिछाडीवर आहेत.

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात 70 पैकी 64 जागांचे कल हाती आलेत. यात भाजप 34, काँग्रेस 28, आप 1 तर इतर 1 असे कल आहेत.

मणिपुरमधील (Manipur) 60 पैकी 41 जागांचे कल समोर आले आहेत. यात काँग्रेस 15, भाजप 19, एनपीपी 0 तर इतर 1 जागेवर आघाडी मिळवली आहे.

गोवा (Goa) राज्यात 40 जागा आहेत. या सर्व जागांचे सुरुवातीचे कल समोर आलेले आहेत. यात काँग्रेस (Congress) 18 भाजप 17 आप 1 व इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. भाजप (BJP) बंडखोर उत्पल परिकर यांनी आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!