धक्कादायक….. धनंजय मुंडे यांच्यावर तरुणीने केले गंभीर आरोप

मुंबईः दि.१२- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर नात्यातील एका तरुणीने गंभीर आरोप केल्याचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या अॉनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झालले असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्याकडून अद्याप याबाबतीत कसलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर आज थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप करण्यात आले आहेत.  याबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तानूसार, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची नातेवाईक असणाऱ्या तरुणीने दि.१० जानेवारी रोजी ओशिवरा पोलिस (Police) ठाण्यात तक्रार अर्ज दिला. याला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला. मात्र पोलिसांनी दखल घेतली नसल्याने तरुणीने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पोलिस आयुक्त, खा. सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनाही ट्वीट करुन साद घातली. याबाबत मुंबई पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत. तक्रारीत तरुणीने २००६ पासून अत्याचार करत असल्याचे सांगत बॉलिवूड मध्ये चांगली संधी देण्याचे आमिष दिल्याचे म्हटले आहे. सदरील वृत्तामुळे मात्र धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांत संताप व्यक्त होत आहे. सदरील प्रकार हा खोडसाळपणातून झाला असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!