बिहारमध्ये तेजस्वीची क्रेझ;… एमआयएमला ५ जागा

बिहार निवडणूक २०२० (Bihar Election 2020)
बिहार निवडणूकीच्या Bihar Election 2020 मतमोजणीतील अत्यंत रोमहर्षक लढतीत अखेर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असुन बिहारमध्ये सर्वाधिक पसंती मात्र तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मिळाली आहे. सकाळी सुरुवातीला महागठबंधन काठावरच्या बहुमतावर दिसत होती. महागठबंधन UPA आणि एनडीएत NDA कांटे की टक्कर झाली. मात्र दुपार होता होता चित्र बदलून नितिश कुमारच्या एनडीए बहुमताचा आकडा पार करत १२२ जागेवर आली. अंतिम निकालावरून बिहारमध्ये नेहमी सर्वाधिक जागा जिंकणारा जेडीयू यंदा ४३ जागेवर येत JDU तिसऱ्या तर भाजपा ७३ जागा घेत BJP दुसऱ्या स्थानावर आहे. तेजस्वी यादवच्या Tejasvi Yadav आरजेडी RJD ७६ जागा मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये एमआयएम या पक्षाने २४ जागा लढवत ५ जागेवर विजय मिळवला.
आत्तापर्यंतची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
एकुण जागा- २४३
एनडीए – ४३+७३+४+४ =१२४
(जेडीयू JDU+भाजपा BJP+व्हिआयपी VIP+एचएएम HAM)
महागठबंधन – ७६+१९+१६= १११
(आरजेडी RJD+काँग्रेस CON+लेफ्ट Left)
लोजपा LJP -१
अन्य OTH- ८
दरम्यान सत्तासंघर्षात आरोप प्रत्यारोप सुरु असुन आरजेडीच्या वतीने ११९ विजयी उमेदवारांची यादी दाखवत निवडणूक आयोगाने दबावात निकालात उलटफेर केल्याचा आरोप केला आहे. अंतिम निकाल घोषित करण्यास सुरुवात होणार आहे.