माझं गाव

धक्कादायक … धारुर तालुक्यात कोरोनाग्रस्त महिलेचा संशयास्पद मृत्यू; भावाच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस.

किल्लेधारूर दि.25 मे – धारूर तालूक्यातील गांवदरा येथील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह (Corona Positive) आलेल्या महिलेचा गावातच विहिरीत प्रेत आढळून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सदरील महिला मृत झाल्यानंतर याची आरोग्य विभाग व पोलिसात कसलीही माहिती न देता तिचे नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले असून आज दि.25 रोजी मयतेच्या भावाने सदरील प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार केल्यानंतर प्रकार उघडकीस आला.

(Shocking … Suspicious death of a woman suffering from coronation in Dharur taluka; Type revealed after brother’s complaint.)

एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आल्यावर आरोग्य विभागाकडून सदरील रुग्णांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. मात्र येथील आरोग्य विभागाने कुठलीच कारवाई न केल्याने हि महिला घरीच राहीली. आठव्या दिवशी सदरील महिलेने गावातील विहिरीत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र पॉझिटीव्ह असलेल्या सदरील महिलेवर सासरच्या मंडळीनी परस्पर तिचा अंत्यविधी केला.

या प्रकरणी संबंधीत महिलेचा भाऊ राजदीप नागनाथ मुंडे याने धारुर पोलीस स्टेशनला (Police Station) मृत्यू वर संशय (Suspicious death) घेत तक्रार केल्यावर हे प्रकरण समोर आले. तालूका आरोग्य विभागाने संबंधीत महिला होम आयसोलेशन मध्ये असल्याचा दावा केला आहे. संशयास्पद मृत्यूची चौकशी पोलीस करत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे यांनी सांगीतले.

तालूक्यातील गांवदरा येथील अनूसया गोरख घुले (33) या महिलेने 9 मे रोजी धारूर येथील कोविड सेंटर वर स्वॅब दिला होता. या स्वॅबचा चाचणी अहवाल 11 मे रोजी पॉझिटीव्ह आला. अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर आरोग्य विभागाकडून या रुग्णाशी कुठलाच संपर्क न केल्याचा दावा या महिलेच्या पतीने केला आहे. तेलगाव व धारूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, सदरील महिला दि.18 मे रोजी घरातून अचानक गायब झाली. घरच्यांनी शोधाशोध घेतला असता तिचा कुठेच शोध लागला नाही. दि.19 मे रोजी गावातच विहिरीत तिचे प्रेत तरंगत असताना आढळले असे सासरचे मंडळीनी माहिती दिली. त्यांनी प्रशासनास कुठलीच कल्पना न देता तिचे अंत्यसंस्कार उरकले. सदरील घडलेल्या प्रकारापासून आरोग्य व पोलिस प्रशासनाला आजवर कसलीच माहिती नाही.

संबंधीत मयत महिलेचा भाऊ राजदीप नागनाथ मुंडे यास प्रकार समजल्यावर त्यांने धारूर पोलीस स्टेशनला (Police Station) आपल्या बहिणीच्या मृत्यूवर संशय घेत या प्रकरणी चौकशी करून सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. हा मृत्यु खुन की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जात आहे. या मृत्यूमुळे सासरचे मंडळी बरोबर आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा उघड होत आहे.

संबंधीत मयत महिलेच्या पतीने पत्नी पॉझिटीव्ह आल्यावर आरोग्य यंत्रणेने कुठलीही दक्षता घेतली नाही व विचारपूस हि केली नाही असे सांगीतले. तर तालूका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले यांनी हि महिला होम आयसोलेशन (Home isolation) मध्ये ठेवल्याचे सांगीतले. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या तक्रारी वरून सहायक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे हे चौकशी करत असून चौकशीतून जे स्पष्ट होईल त्या नूसार कारवाई केली जाईल असे पालवे यांनी सांगीतले.

गेल्या काही दिवसांपासून धारुर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ढिसाळ कारभारामुळे प्रकाशझोतात आहे. आज सदरील धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस यंत्रणा प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

आरोग्य प्रशासन होम आयसोलेशनचा (Home isolation) दावा करत असला तर खाजगी रुग्णालयात उपचार कसा? मयत पॉझिटीव्ह रुग्णाची ट्रेसिंग केली का? घरातील लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या का? होम आयसोलेशनची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गावात एका महिलेचे प्रेत विहिरीत आढळून ही पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद का नाही? मयतावर शवविच्छेदन झाले का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!