परळीत महिलेची हत्या; तर एक तरुणी गंभीर जखमी.

परळी दि.26 फेब्रुवारी – परळी गावाजवळ असलेल्या आयेशा नगर येथे शनिवारी एका 50 वर्षांच्या महिलेवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात तिची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
( Woman stabbed to death in Parli A young woman was seriously injured. )
या हल्ल्यात महिलेची 16 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मृत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद आणि मुलीचे नाव मुस्कान असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
दोन दिवसांपुर्वीच परळी तालुक्यात वयोवृध्द सख्ख्या भाऊ व बहिणीच्या खूनाची (Murder) घटना घडली होती. यातच आज पुन्हा खुनाच्या घटनेने परळीत खळबळ उडाली आहे. परळी (Parli) परीसरातील वाढत्या गुन्ह्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. यामुळे पोलिसांसमोर (Police) कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन उभे राहिले आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात दोन दिवसांत कायदा व सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाल्याचे दिसून येत आहे. बीड शहरात गोळीबाराची (Firing) घटना ताजी असताना आज केज तालुक्यात आडस येथे चोरीची तर गेवराईत मानवी सांगाडा सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.