BEED24

धक्कादायक … लग्नाच्या एक दिवस आधी नवरी मुलीची प्रियकरासह आत्महत्या; भोकरदन तालुक्यातील घटना.

भोकरदन दि.16 मे – हळदीच्या अंगाने मामाच्या मुलासोबत पलायन करून नवरी मुलीने लग्नाच्या एक दिवस आधि प्रिकरासोबत आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना घटली. या घटनेमुळे मालखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

(Shocking … The bride commits suicide with her boyfriend one day before the wedding; Incidents in Bhokardan taluka.)

या बाबतची अधिक माहिती अशी की, स्नेहा राजू आव्हाड रा.मुबंई या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे यांच्या सोबत विवाह जुळला होता. दि.16 मे रोजी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. याविवाह साठी मुलींकडील नातेवाईक कोळेगाव येथे आले. दि.15 मे रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम घेण्यात आला. नवरीला व नवरदेवाला हळद लावण्यात आली व रात्री उशिरा सर्व जण झोपी गेले.

मात्र पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान स्नेहा आव्हाड ही तिचा प्रियकर असले मामाचा मुलगा सुरेश नवनाथ गायकवाड (21) रा.मालखेडा याच्या सोबत कोळेगाव येथून दुचाकीवर मालखेडा येथे गेली. आपण एकत्र जगण्या मरणाची शपथ घेतली आहे, मात्र दुसऱ्या मुलाशी लग्न (marriage) होत असल्याने ते सहन करु शकले नाही. स्नेहा राजू आव्हाड रा. कोळगाव ह.मु.मुबई व सुरेश या दोघांनी 15 मेच्या रात्री सुरेश गायकवाड यांच्या घरात एकत्र दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

नातेवाईकांना माहिती कळताच एकच गर्दी झाली. या प्रकरणाची माहिती भोकरदन पोलिसांना (Police) देण्यात आली. भोकरदन पोलिसांनी (Police) घटनास्थळी जावून पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राजाराम तडवी हे पुढील तपास करीत आहेत.

भावी नवरदेव रुग्णालयात…
आज आपला विवाह (marriage) होऊन सुखी संसाराचे स्वप्न बघत असलेल्या शुभम साळवे याला मात्र घटनेमुळे धक्का बसला. आपल्या भावी पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला तात्काळ भोकरदन (Bhokardan) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version