BEED24

धक्कादायक…अंबाजोगाईत आज कोरोनाचे तीन बळी…

अंबाजोगाई दि.१३ (प्रतिनिधी) एकीकडे कोरोना हदपार होत असताना पुन्हा अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दि.१३ शनिवारी एकाच दिवसात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे.

शहरातील एक शिक्षक प्रथम दर्शनी कोरोना पॉजीटिव रिपोर्ट आला नंतर निगेटिव रिपोर्ट आल्यानंतर त्याचे वडिल भाऊ चे रिपोर्ट पॉजिटिव आल्यानी शिक्षक मुलगा घाबरुन हद्यविकाराच्या झटक्यानी गुरुवारी रात्री निधन झाले ते ४० वर्षाचे होते. शुक्रवारी त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार केले. आज शनिवार रक्षा सावडण्याच्या अगोदरच वडीलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच कुटुंबातील एक मुलगा व मयत मुलाची आई रुग्नालयात कोरोना शी लढत आहेत. आज सकाळी त्यांचे ८० वर्षे वयाचे घरातील व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला. घरातीलच व्यक्ती अंत्यविधीला नाहीत असे दुर्दैवी चित्र आज दिसून आले असून अंत्यविधीत हजर राहता येत नसल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

एकाच चितेवर तिघांचे अंत्यसंस्कार 

आज दि.१३ फेब्रुवारी रोजी शहरातील सर्वे नंबर १७ येथे दोन दिवसापूर्वी ४० वर्षाच्या शिक्षक मुलाचा मृत्यू झालेल्या ८० वर्षीय वडीलांचा मृत्यू कोरोनाने (Corona death) झाला आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातील एका ६४ वर्षीय व्यक्तीचाही आज मृत्यू झाला आहे. तालुक्यातील (ममदापूर पाटोदा) येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे (Corona death) झाला असून एकाच दिवशी अंबेजोगाई (Ambajogai) तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version