भरदुपारी तरुणावर गोळीबार; बीड जिल्ह्यातील थरार.

बीड दि.17 जुलै – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे घडली. याप्रकरणी दोघां विरोधात गेवराई पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Shooting at young man in the afternoon; Thrill in Beed district.)

याबाबत पोलिस (Police) सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व बांधकाम साहित्याचे दुकान आहे. शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे थांबलेले असताना याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले.

यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तूल लावून गोळी झाडली. सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात (Firing) तरुणाचे प्राण वाचले. हि घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!