मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सिल्वर ओक गजबजले; राजकीय घडामोडींना आला वेग.

मुंबई दि.23 फेब्रुवारी – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर ( Varsha Bunglow ) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे निवास्थान आघाडी शासनातील मंत्र्यांनी गजबजले आहे.

( Silver Oak swarmed after the arrest of Minister Nawab Malik; Political developments gained momentum. )

संध्याकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढणार असून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

अजित पवार, धनंजय मुंडे सिल्व्हर ओकवर
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) सिल्व्हर ओकवरती पोहोचले आहेत. इतर मंत्री ही सिल्व्हर ओक ( Silver Oak ) या ठिकाणी पोहोचत आहेत. तिथे राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांची बैठक होईल. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित वर्षावर जातील. यासोबतच काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आशोक चव्हाणही (Ashok Chavan) सिल्वर ओकवर पोहोचले आहेत.

नवाब मलिकांना ED कडून अटक
तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress Party ) नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली.

नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दरम्यान नवाब मलिक राजीनामा देण्याचीही शक्यता आहे.

लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे
अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिलीय. अटक केल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसताना नवाब मलिक यांना पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, “लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे,” असं म्हटलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!