बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे रुग्णालयात; फार दगदग करू नकोस, काळजी घे…

मुंबई दि.13 एप्रिल – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. यानंतर पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात भेटी दिल्या. यातच त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे याही रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
सामाजिक न्यायमंत्री (Minister of Social Justice) धनंजय मुंडे यांना मंगळवारी अस्वस्थ्य वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यांना डॉक्टरांकडून सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडें यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP Leader) मंत्रीमंडळातील सहकारी व कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचत आहे. यासोबतच त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे आणि खा. डॉ.प्रीतम मुंडे (Pritam Munde) याही रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट भाजप नेत्या (BJP Leader) पंकजा मुंडे यांनी घेतली.
कट्टर राजकीय शत्रू असलेल्या या बहिण भावांमध्ये यावेळी कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. फार दगदग करू नकोस, काळजी घे, असा सल्लाही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी भाऊ धनंजय मुंडे यांनी दिल्याचं समजतंय. सतत एकमेकांवर राजकीय आगपाखड करणारे भाऊ बहिण सुखदुखाच्या प्रसंगात मात्र नेहमीच एकत्र आलेले दिसून येतात.
दरम्यान, धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका (Heart attack) आल्याची बातमी पसरली. परंतू झटका वैगेरे नाही, डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. आज त्यांना विशेष रुममध्ये हलवण्यात येईल. सर्व तपासण्या सुरु असून काही राहिल्या आहेत. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमासमोर दिली आहे.
( Sisters Pankaja Munde and Pritam Munde at the hospital; Don’t worry, be careful … )