सहा वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला; ऊसतोड सुरु असताना घडली घटना.

बीड दि.2 फेब्रुवारी – बीड (Beed) तालुक्यातील ऊसतोड कामगाराच्या सहा वर्षीय बालकावर बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याची घटना तडवळे (ता.शिराळा) येथील गोल पानंद येथे मंगळवारी (दि.1) सांयकाळी घडली. यात बालक गंभीर जखमी झाले असून सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(Six-year-old boy attacked by leopard; The incident happened while the cane was being started.)
ऊसतोड कामगारांचा (Sugarcane labour) मुलगा गणेश श्रीराम कामबीलकर (वय 6 रा.मानकुरवाडी जि. बीड) या बालकांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. सदर घटना मंगळवार दि.1 रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. जखमी बालकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगली (Sangli) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वारंवार होणाऱ्या बिबट्या च्या हल्याने नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगार यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्या व गव्यांचा बंदोबस्त वनविभागाने (Forest Department) करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोल पानंद येथील शिवाजी तुकाराम पाटील यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती. सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान ट्रॅक्टर मध्ये ऊस भरण्याचे काम सुरू होते. सांयकाळची वेळ असल्याने अंधार पडला होता.
यावेळी अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बसलेल्या गणेश वर हल्ला करून त्याला नरड्याला पकडून बिबट्या पळताना दुर्गा दुरंदरे ऊसतोड कामगार महिलेने पाहिले. तिने आरडाओरडा केल्याने तेथील ऊसतोड कामगार, ट्रॅक्टर चालक आदींनी बिबट्या चा पाठलाग केला असता बिबट्या गणेश ला टाकून पळून गेला.
यानंतर तातडीने अमृत पाटील , सुभाष पाटील आदी ग्रामस्थांनी जखमी गणेश ला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याचेवर डॉ.अनिरुद्ध काकडे , डॉ गणेश राजमाने यांनी प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
यापुर्वीही याभागात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वनविभाग सतर्क झाले असून कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले. वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल हणमंत पाटील वनरक्षक बिऊर, वनरक्षक अक्षय शिंदे, क्षेत्रसहाय्यक बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बिबट्या ची शोध मोहीम सुरू केली.