सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

परळीः दि.१(प्रतिनिधी)- सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज मराठवाडा विभाग पदवीधर निवडणुकीसाठी (Graduate constituency) एक तारखेला, एक वाजता गाढेपिंपळगाव येथील शाळेत पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून जवळपास ६० टक्के मतदान झाले.

मतदान यादीत नोंद असलेल्या सर्व पदवीधर बांधवांनी आपले मतदान ही आपली जबाबदारी आणि कर्तव्यसुद्धा आहे. घराबाहेर पडा, मतदान करा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. जवपास ६० टक्के मतदान झाले असून अद्याप प्रशासकीय आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!