आज बीड जिल्ह्यात 580; धारुरमध्ये 15 तर केजमध्ये 50 रुग्ण.

बीड दि.7 एप्रिल- राज्यात कोरोनाचा उद्रेकात बीड जिल्हा मागे नाही. जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 3529 प्राप्त अहवाला पैकी 580 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. आजचा कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. 2949 जण निगेटिव्ह आली आहेत.
आज एकतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 146 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर दुसरे हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाई तालुक्यात आज 114 तर धारुर तालुक्यात संख्या वाढून 15 केजमध्ये 50 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
(580 in Beed district today; 15 patients in Dharur and 50 patients in Kaij.)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-146, अंबाजोगाई-114, आष्टी-71, धारुर-15, गेवराई-36, केज-50, माजलगाव-39, परळी-60, पाटोदा-18, शिरुर-21, वडवणी-10
अशी आहे.
सध्या कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक दिसून येत आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.7 बुधवारी दुपारी आजची आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात बाधितांची संख्या काल सर्वाधिक 716 होती ती आज 580 झाली आहे. बीड जिल्ह्यात काल पासुन कडक निर्बंध लावण्यात आलेली आहेत. दहा दिवसांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा सर्व व्यवसाय ठप्प आहेत. कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाची स्थिती अद्यापही गंभीर आहे. मंगळवारी राज्यात 55,469 रुग्ण आढळून आले असून 297 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 34,256 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.