साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे निधन; टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली.

बेंगळुरू दि.29 ऑक्टोबर – साऊथचा सुपरस्टार कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar ) यांचं 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यामधून दुख व्यक्त होत असून टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

(South superstar Puneet Rajkumar passes away; Tributes from Tollywood to Bollywood and also from the world of cricket.)

आज सकाळी पुनीत यांना बेंगळुरू (Bengaluru) येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये ( Vikram Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा ( heart attack) झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये (Intensive Care Unit ) उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई रुग्णालयात
29 ऑक्टोबर रोजी पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. अभिनेत्यावर अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टर उपचार सुरु होते. त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई (Chief Minister Basavaraj S. Bommai) यांनी पुनीत राजकुमार यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल गाठलं.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांचं ट्विट क्रिकेटर विरेंद्र सिंह सेहवागनंही (Virendra Sehwag) ट्विट करुन पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!