संजय राठोड यांचे होणार पुनर्आगमन; उदय सामंत यांचं सुचक विधान.

वर्धा, दि. 11 जुलै – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan suicide case) शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) केलं आहे.
(Sanjay Rathore’s return; Uday Samant’s suggestive statement.)
उदय सामंत शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय तंत्रनिकेतन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अध्यापक महाविद्यालय इत्यादी संस्थांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan suicide case) संजय राठोड (Sanjay Rathore) हे मंत्रिपदावरून पायउतार झाले होते. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला (Shivsena) गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.
नारायण राणे (Narayan Rane) हे केंद्रात मंत्री जरी झाले तरी त्याचा परिणाम कोकणावर होणार नाही. त्यांची कार्यशैली सर्व जण पाहून आहे. शिवसेना (Shivsena) कोकणात मजबूत आहे, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदामुळे काहीही होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या डॉ.प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होता. आम्हालाही असंच वाटलं होतं. पण, ऐनवेळी त्यांना डावलण्यात आलं. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलले जात आहे, हे आता स्पष्ट झाले आहे, असंही सामंत म्हणाले.