एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन… बीडमध्ये आज अशी आहे स्थिती.

बीड दि.27 नोव्हेंबर – एसटी कर्मचाऱ्यांचं (ST employees) आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच असून बीडमध्येही आज बसस्थानकात शुकशुकाट पहायला मिळाला. अहमदनगर (Ahemadnagar)  व कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली जात आहे. दरम्यान, एसटीचा संप मोडीत काढण्यासाठी सरकार विविध स्तरांवरून प्रयत्न करीत आहे. कर्मचारी कामावर परतल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांतून होत आहे.

(ST workers’ agitation … This is the situation in Beed today.)

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच ठेवण्यात आलेलं आहे. आ.सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी माघार घेतल्यानंतर ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यांना भीती दाखवू नका, असं म्हणत सदावर्ते यांनी अनिल परबांना इशाराही दिला आहे.

काल अहमदनगरमधील शेवगाव व  कोल्हापूरमधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामावर हजर होणार असून एसटीची सेवा सुरळीत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेतनवाढीनंतरही संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी गर्भित इशारा दिला. वेतनवाढ केल्यानंतरही संप (Strike) सुरु ठेवणार असाल तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल असं अनिल परब म्हणालेत.

एसटी महामंडळानं (ST corporation) काल 500 कंत्राटी कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलं आहे. पगारवाढ मूळ वेतनात दिल्यानं ग्रेडवर काही फरक पडेल का यावरही चर्चा झाल्याचं मंत्री अनिल परब यांनी सागितलं आहे. सातवा वेतन आयोग देऊन करार 10 वर्षांचा करण्याचा विचार करु असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एसटीचा संप मोडीत काढण्यासाठी सरकार विविध स्तरांवरून प्रयत्न करीत आहे. कर्मचारी कामावर परतल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. वस्तुस्थिती वेगळी आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका शुक्रवारी पुन्हा एकदा संपकऱ्यांनी घेतली.

एसटी कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर न परतल्यास सेवा समाप्तीची कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. सरकारने कितीही दबावतंत्राचा अवलंब केला तरी विलीनीकरणाची मागणी पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

बीडमध्ये एसटी ठप्पच…
आजपासून बीड (Beed) बसस्थानकातून बस पोलिस बंदोबस्तात सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे आज सकाळपासून अनेक प्रवाशांनी बसस्थानकाकडे प्रस्थान केले. परंतू एकही बस अद्यापपर्यंत धावली नाही. 145 कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात प्रशासकीय विभागातील 353 पैकी 114, यांत्रिक कार्यशाळा विभागातील 478 पैकी 28, 2 वाहक व 1 चालक कामावर हजर झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!