कापूस खरेदीस प्रारंभ….; शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द-निर्मळ

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) येथील नर्मदा फायबर्स जिनिंग येथे आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खाजगी कापुस cotton खरेदीचा शुभारंंभ करण्यात आला. यावेळी जिनिंग मालक उद्योजक माधव निर्मळ Madhav Nirmal यांनी शेतकऱ्यांची दिवाळी Diwali गोड करण्यासाठी खरेदी सुरु करत असून शेतकरी हितासाठी सदैव कटीबध्द असल्याचे मत व्यक्त केले.
आज शुभ मुहूर्तातील एक दिवाळी Diwali पाडवा साजरा होत आहे. या पाडव्याच्या निमित्तानं नवनवीन उद्योग, व्यवसाय उभारुन खरेदी विक्रीची सुरुवात केली जाते. सणासुदीत शेतकऱ्यांच्या हातात पैसा उपलब्ध व्हावा या हेतूने येथील नर्मदा फायबर्स जिनिंगमध्ये कापुस cotton खरेदीचा शुभारंभ जि.प. चे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांच्या उपस्थितीत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे, उपसभापती सुनिल शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापारी आशोक दरेकर व विजय निर्मळ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माधव निर्मळ Madhav Nirmal यांनी वडिलांनी दिलेला समाजहीताचा वसा पुढे चालू ठेवत सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास सदैव कटिबध्द असल्याची प्रतिक्रिया दिली. आज शुभारंभ प्रसंगी ५१५१ प्रति क्विंटल भाव देण्यात आला. यावेळी राजाभाऊ निर्मळ, अनिल महाजन, संजित कोमटवार, बाळासाहेब सोनटक्के, सुधीर शिनगारे, नितिन शिनगारे, सय्यद हारुण, मदन धोतरे, सुरेश फावडे, आमोल जगताप, अभय भावठाणकर, सिध्देश्वर रंणदिवे, गणेश सावंत, देवा लोंढे, तानाजी लासुणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.