अखेर केज धारूर पाणी पुरवठा योजनेची वीज जोडली;
बारा दिवसानंतर होणार पाणी पुरवठा

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) केज धारूर सह बारा गाव पाणी पुरवठा योजनेकडे विद्युत वितरण कंपनीचे विज बिलाचे १० कोटी ९८ लाख ५३ हजार ९८३ रुपयाचे वीज बिल थकल्याने सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला होता. तो केज नगर पंचायतीने तीस लाख व धारूर नगरपालिकेने तीस लाख असा एकूण साठ लाख रुपयाचा भरणा केल्या नंतर तब्बल नऊ दिवसां नंतर मंगळवार दिनाक 2 मार्च रोजी वीज पुरवठा चालू करण्यात आला असल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली आहे. दोन्ही संस्थानी चालू बाकीचे हप्ते पाडून देण्याची मागणी केली असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या बारा दिवसांपासून खोळंबलेला पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याने नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे.
Finally Cage connected the Dharur water supply scheme;
केज धारूर सह बारा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील विद्युतपंपाचे १० कोटी ९८ लाख ५३ हजार ९८३ रुपयाचे वीज बिल थकल्याने केज धारूर सह बारा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला होता. तर ३ कोटी ५५ लाख ४८ हजार ६१८ रुपयाच्या थकबाकी पोटी जलशुद्धीकरणं केंद्राकडे हि वीज बिल थकले होते. पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज बिलाच्या वसुलीसाठी खंडित करण्यात आल्याने मांजरा धरणात पाणी असतानाही केज धारूर सह बारा गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. तब्बल नऊ दिवसा नंतर केज नगर पंचायतीने थकीत वीज बिलापोटी तीस लाख व धारूर नगर पालिकेने तीस लाख रुपये असे एकूण साठ लाख रुपयाचा भरणा केला असल्याने केज धारूर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा चालू करण्यात आला असल्याची माहिती केज विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली. दरम्यान नऊ दिवसा नंतर केज धारूर पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा जोडण्यात आल्याने नागरिकांना पुरवत पाणी पुरवठा करण्यात येणार येणार आहे. केज धारूर पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज बीला पोटी धारूर नगरपालीकेने तीस लाख रुपयाचा भरणा केला असून नागरिकांना पुर्ववत पाणी पुरवठा सुरु होईल असे मुख्याधिकारी नितीन बागूल यांनी सांगीतले
चालू थकबाकीचे साठ हप्ते करून द्यावीत- नगराध्यक्ष डॉ. हजारी
धारूर केज सह बारा खेडी पाणी पुरवठा योजनेची जुनी थकबाकी जि. प. ने भरावी तर चालू बाकी चे साठ समान हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी महावितरणकडे केली असून लवकरच या बद्दल निर्णय होईल अशी अपेक्षा धारुरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी व्यक्त केली आहे.