राज्यस्तरीय रासेयो पुरस्कार जाहिर; धारुरच्या सुपूत्राचा समावेश.

किल्लेधारूर दि.13 अॉगस्ट – राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (NSS) सन 2020- 2021 च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा दि.12 अॉगस्ट रोजी करण्यात आली असून यात राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर (Latur) येथे कार्यरत धारुरचे (Dharur) सुपूत्र प्रा.डॉ. कल्याण सावंत यांचा समावेश आहे.
(State-level Raseyo Award revealed; Including Dharur’s son.)
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात (Maharashtra) राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून रासेयो (NSS) पुरस्कार 1993-94 पासून देण्यात येतात. निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्या त्यांच्या अंगिकृत कामाला प्रोत्साहन देवून त्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय पुरस्कार (State level awards) निवड समितीच्या वतीने निवड केली जाते. सन 2020-21 च्या राज्यस्तरीय पुरस्कारात उत्कृष्ट विद्यपिठ म्हणून गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोलीची निवड करण्यात आली. तर सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कारात प्रा.डॉ. कल्याण सावंत यांचा समावेश आहे.
असे आहेत पुरस्कार.
सर्वोत्कृष्ठ विद्यापाठ- गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली, सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम समन्वयक- डॉ.नरेश मधूकर मडावी, गोंडवाना विद्यापिठ.
सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी..
1. सुशिल राम शिंदे, ठाकुर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कांदिवली, मुंबई, मुंबई विद्यापिठ.
2. डॉ.विलास वसंतराव कर्डिले, अनेकांत एज्युकेशन सोसायटी, तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापिठ, पुणे.
3. गुरुदास दादाजी बल्की, श्री.शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राजुरा, चंद्रपुर, गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली.
4. डॉ.कल्याण धोंडिबा सावंत, राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग निहाय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी या पुरस्काराने धारूरचे भूमिपुत्र राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे कार्यरत प्रा. कल्याण धोंडीबा सावंत यांना घोषित झाला आहे. पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्काराची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर देसाई यांनी केले. प्रा. कल्याण सावंत यांनी राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती.