पुतळा विटंबना प्रकरणी बर्दापूर येथे कडकडीत बंद; गावात तणावाचे वातावरण

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना
अंबाजोगाई दि.२८(प्रतिनिधी)- तालुक्यातील बर्दापूर येथे पोलीस Police स्टेशन जवळच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांचा पुतळा असून या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी पहाटे दोन ते पाच दरम्यान दगडाने मारुन चेहरा विद्रुप करून विटंबना केल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आला असुन फिर्यादी पो.हे.शिवाजी सोनटक्के यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्यामुळे समाज बांधव पोलीस Police स्टेशन जवळ येत आहेत. पोलीस स्टेशनला खेटूनच डॉ. आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांचा पुतळा असल्यामुळे या घटनेला महत्व आहे. या पुर्णाकृती पुतळ्याची अज्ञात समाज कंटकांने विटंबना केल्यामुळे पोलिसां विषयी प्रचंड रोष निर्माण होऊन पोलीस Police उपनिरीक्षक यांच्याविरोधात जमावाने घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. यासाठी शेकडो बांधवांनी ठिय्या आंदोलन केले असून बर्दापूर गाव कडकडीत बंद आहे. आंदोलकांनी टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना तात्काळ शोधून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. गावासह इतर ठिकाणी शांतता कायम रहावी, गडबड गोंधळ होवू नये यासाठी आमदार संजय दौंड यांच्यासह कॉ.बब्रुवाहन पोटभरे, सुनील जगताप, प्रमोद दासुद, अमोल पवळे, शैलेश कांबळे यांनी प्रयत्न केले. दरम्यान या घटनेची फिर्यादी पो.हे.शिवाजी सोनटक्के यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 295,153(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आर.टी. जमादार करत आहेत.