नसता बीड जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा.

बीड दि.2 जून – जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने 1 जून पासून लॉकडाऊन मधील अनेक कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, जिल्ह्यातील नागरिक पुन्हा बेफिकिरीने वागत असून नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक लॉकडाऊनचा इशारा दिला.
(Strict lockdown in Beed district again; Collector’s warning.)
लोकांच्या बेफिकीर वागणूकीमुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (lockdown) लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज दि.2 रोजी दिला आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी, लॉकडाऊन शिथील केल्यानंतर विनाकारण लोक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसून येतात ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. सद्यस्थितीत कोविड रुग्णसंख्या (Corona Positive) जरी कमी असली तरी गर्दी केल्यास अथवा कोव्हीडचे अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन (lockdown) लागू केला जाईल.
बेशिस्त नागरीकांच्या वागणुकीचा परिणाम सर्व समाजास त्रासदायक होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व कोव्हीडचे नियम पाळुन दिनांक 15 जून पर्यंत शासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. आज 375 कोरोना बाधित (Corona Positive) आढळली तर काल ही संख्या 361 होती. लॉकडाऊनमध्ये सकाळी 7 ते 11 शिथिलता असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक इशारा दिला आहे.