धारुर तालुक्यातील विद्यार्थी घेणार AIIMS मध्ये वैद्यकीय शिक्षण; पहिल्याच यादीत झाली निवड.

किल्लेधारूर दि.27 जानेवारी – तालुक्यातील मोरफळी येथील विद्यार्थी सौरभ प्रल्हाद गडदे याने वैद्यकीय पूर्वपरिक्षेत (NEET) 651 गुण मिळवले होते. यानंतर त्याची हैद्राबाद येथील AIIMS मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पहिल्याच यादीत निवड झाली आहे. त्याच्या या यशा बद्दल सर्व स्तरावर कौतूक होत आहे.
(Student from Dharur taluka will take medical education in AIIMS; The first list was selected.)
कोरोना (Corona) काळ विद्यार्थ्यांसाठी मोठा अडचणीचा ठरला आहे. गेल्या दिड वर्षात कोरोनामुळे सर्व महाविद्यालय (college) व खाजगी शिकवणी वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अॉनलाईन शिक्षणाचा (Online education) पर्याय देण्यात आला होता. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम गुणवत्तेत होवून विद्यार्थ्यांच्या टक्केवारी घसरली.
यातच तालुक्यातील मोरफळी येथील रहिवासी व परळी तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रल्हाद गडदे यांच्या सौरभ या मुलाने वैद्यकीय पूर्वपरिक्षेत नेत्रदिपक यश मिळवले होते. अशा साथरोग काळात नीट वैद्यकीय पूर्व परिक्षेत सौरभने तब्बल 651 गुण मिळवून एमबीबीएस (MBBS) या वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला.
सध्या नीट वैद्यकीय पूर्व परिक्षेत पात्र विद्यार्थ्यांची एमबीबीएस (MBBS) व इतर वैद्यकीय शिक्षणासाठी निवड सुरु आहे. या निवड यादीत सौरभ गडदे याची हैद्राबाद (Hyderabad) येथील AIIMS मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पहिल्याच यादीत निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल परळी व धारुरसह जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.