धारुर तालुक्यातील विद्यार्थ्यांने मिळवले 651 गुण; NEET Result.

किल्लेधारूर दि.2 नोव्हेंबर – तालुक्यातील मोरफळी येथील विद्यार्थी सौरभ प्रल्हाद गडदे याने वैद्यकीय पूर्वपरिक्षेत (NEET) 651 गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशा बद्दल सर्व स्तरावर कौतूक होत आहे.
(Students of Dharur taluka scored 651 marks; NEET Result.)
कोरोना (Corona) काळ विद्यार्थ्यांसाठी मोठा अडचणीचा ठरला आहे. गेल्या दिड वर्षात कोरोनामुळे सर्व महाविद्यालय (college) व खाजगी शिकवणी वर्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अॉनलाईन शिक्षणाचा (Online education) पर्याय देण्यात आला. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम गुणवत्तेत होवून विद्यार्थ्यांच्या टक्केवारी घसरली.
यातच धारुर (Dharur) तालुक्यातील मोरफळी येथील रहिवासी व परळी तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रल्हाद गडदे यांच्या सौरभ या मुलाने वैद्यकीय पूर्वपरिक्षेत नेत्रदिपक यश मिळवले. अशा काळात नीट परिक्षेत सौरभने तब्बल 651 गुण मिळवून एमबीबीएस (MBBS) या वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला. त्याने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल परळी व धारुरसह जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.