कोरोंना विशेष

धारुरने कोरोनाची पन्नासी ओलांडली….!  १९ ठिकाणी कंटेनमेंट झोन

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर) शहर व तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दि.१४ आगस्ट पर्यंत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने पन्नासी ओलांडली आहे. तर शहरासह तालुक्यात १९ कंटेनमेंट झोन असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

सुरुवातीची दोन महिने निरंक असलेल्या शहर व तालुक्यात प्रवास करुन येणाऱ्याच्या रुपात कोरोनाचा तालुक्यात प्रवेश झाला. जुलै अखेर पासुन खऱ्या अर्थांने शहरात कोरोनाचा संसर्ग पहावयास मिळाला. गेल्या पंधरा दिवसातच कोरोनाने पन्नासी गाठली. इतर ठिकाणा पेक्षा कोरोना संसर्ग होण्याचा वेग कमी असला तरी दररोज रुग्ण आढळून येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सध्या तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३० आहे. एकुण रुग्ण संख्या ५९ झाली आहे. बरे होवून परतलेले २७ तर मृत्यू झालेल्यांची संख्या २ आहे. सध्या शहरात १७ तर ग्रामीण भागात २ अशी १९ कंटेनमेंट झोन आहेत. शहरातील कोविड केअर सेंटरमधून दररोज प्रवासी व पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासितांचे स्वॅब नमुने घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!