बीड जिल्ह्यात आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.8 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2589 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 41 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2548 जण निगेटिव्ह आली आहेत. बीड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल असली तरी कोरोना मृत्यू दर चिंताजनक आहे. सोमवारी पुन्हा तिन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-5, आष्टी-18, धारुर-2, गेवराई-1, केज-6, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-2, शिरुर-0, वडवणी-4 अशी आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार अतिवृष्टी होवून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कोरोनाच्या बाबतीत मात्र समाधानकारक आकडेवारी दिसून येत आहे. काल दि.7 मंगळवार रोजी केवळ 38 नवीन बाधित आढळली तय 54 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या 748 ॲक्टीव रुग्ण आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 4 हजारांच्या खाली आला आहे. मंगळवारी 3,898 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,581 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 63 लाख 04 हजार 336 इतकी झाली आहे.

राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 97.08 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 86 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 51 लाख 59 हजार 364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 93 हजार 698 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 06 हजार 524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 021 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!