उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सुहास हजारे यांचा सन्मान.

55 / 100

बीड दि.5 अॉगस्ट – उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सुहास हजारे यांचा आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सन्मान केला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 129 कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला.

बीड जिल्हा परिषदेचा अनेक दिवसांपासून रखडलेला कर्मचाऱ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच घेवून ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना सन्मानित केले होते. या पाठोपाठ आता महसूल प्रशासनानेही आज 129 कर्मचाऱ्यांचा गौरव महसूल दिनाचे औचित्य साधून यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितात घेतला.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष तथा बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार ( Naib Tehsildar ) म्हणून गौरव करण्यात आला. हजारे यांनी कोरोना काळात धारुरचे (Dharur) नायब तहसीलदार व धारुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशी दुहेरी भुमिकेत उत्कृष्ट कार्य केले आहे. दुहेरी भुमिका पार पाडत असताना हजारे यांनी सामान्य लोकांच्या कामाने प्राधान्य देत आपल्या मितभाषी स्वभावाने लोकांची मने जिंकली. यानंतर केज व बीडमध्येही त्यांनी महसूल क्षेत्रात उत्कृष्ट काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली. हजारे सध्या बीडचे (Beed) तहसीलदार म्हणून पदभार सांभाळत असून आज जिल्हाधिकारी (Collector) राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात इतर 129 कर्मचाऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. सुहास हजारे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केल्याबद्दल त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
( Suhas Hazare Honored as Outstanding Naib Tehsildar. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!