एकनाथ खडसेंना मिळणार मंत्रीपद; भाजपाला पडणार खिंडार?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशावर आज शुक्रवारचा मुहूर्त ठरला असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी जाहिर केले. साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत सोडचिठ्ठी दिली आहे. ते येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे,” अशी अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली. खडसे यांच्या सोबत दहा ते बारा आमदारही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा होत आहे. याबरोबरच राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रीपद खडसे यांच्याकडे येणार असल्याचीही चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे.

दरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेनंतर कार्यकर्त्यांनी जळगावात पोस्टर लावले. “भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण,” “भाऊ आम्ही सदैव आपल्यासोबत” अशा स्वरुपाचे बॅनर सर्वत्र झळकत आहेत. त्यामुळे समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. कै.गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर भाजपातील एक मोठे ओबीसी नेतृत्व म्हणून खडसेंची ओळख होती. मागच्या काही वर्षात त्यांच्या वर पक्षातून झालेल्या काही घडामोडीतून ते दुखावले गेले होते. दि.23 शुक्रवारी ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत ते हातात घड्याळ बांधणार आहेत.

भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील, पण भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Eknath Khadse may enter NCP with daughter MP daughter in law Raksha Khadse to stay in BJP)
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून खडसे यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असुन यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!