किल्ल्लेधारूर दि.12 अॉगस्ट – Suicide … बाळाचा वाढदिवस Birthday साजरा करण्याची तयारी झालेली असतानाच तरुण पित्याने टोकाची भुमिका घेत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.11 रोजी रात्री घडली. या घटनेमुळे धारुर Dharur शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
धारुर शहरातील कसबा भागातील जाधव गल्ली येथील राहुल माने वय (27) या तरुण व्यवसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या suicide केली. राहुल माने हे पुणे येथील नामवंत बालाजी सेक्युरिटी फोर्सचे संचालक बालाजी माने यांचे लहान बंधू होते. राहुल माने यांचा शहरातील छत्रपती शंभुराय चौकात किड्स मॉल हा व्यवसाय होता. शुक्रवार दि.11 अॉगस्ट रोजी राहुल यांच्या तीन वर्षीय बालकाचा वाढदिवस Birthday होता. वाढदिवस साजरा करण्याची पुर्ण तयारी झालेली असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पंचनामा होवून शवविच्छेदनासाठी त्यांचे शव धारुर Dharur ग्रामीण रुग्णालयात रात्री पाठवण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.12 शनिवार रोजी कसबा विभागातील कसबा तलाव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.