रविवारी वाढ … बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.23 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 8929 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 962 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 7967 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी कमी होत आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आज मात्र जिल्ह्यात चाचणी वाढल्या तशी बाधितांची संख्या वाढली आहे.
(Sunday hike … Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 268 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 64 व आष्टी तालुक्यात 83 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 81 तर केजमध्ये 75 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आज बीड व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आली आहेत.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-268, अंबाजोगाई-64, आष्टी-83, धारुर-81, गेवराई-88, केज-89, माजलगाव-47, परळी-26, पाटोदा-78, शिरुर-109, वडवणी-29 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) दररोज हजारावर येणारी संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. शहरी भागातला संसर्ग कमी होवून सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. देशासह राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून दिलासादायक आकडेवारी आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.
शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे. राज्यात आज 682 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.