सुपरस्टार “गोविंदा” उद्या धनंजय मुंडेंच्या परळीत…

परळी: दि.११- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा ८० वा वाढदिवस ज्येष्ठ सिने अभिनेते गोविंदा (Actor Govinda) यांच्या उपस्थितीत परळीत साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) ८१ किलोचा केक कापणार आहेत.

शरद पवारांच्या वाढदिवसा निमित्त राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जात आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ८१ किलोच्या केकची ऑर्डर दिली आहे. सिने अभिनेता गोविंदा (Film Actor Govinda) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा केक कापला जाणार आहे. परळीत दोन दिवसांपुर्वीच पवारांच्या उंचच्या उंच भव्य असे होर्डींग लावण्यात आली आहेत. प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम राबवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस साजरा करत असतात. यंदाही वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची परळीत जय्यत तयारी केली जात आहे. ८१ किलोचा केक, ८१ फुटांचे होर्डींग आणि अभिनेते गोविंदा यांची उपस्थिती अशा अनोख्या पध्दतीने हा वाढदिवस साजरा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!