बीड जिल्ह्यात शनिवारीही 2 मृत्यू; पहा नवीन कोरोना बाधितांची संख्या.

बीड दि.10 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज गुरुवारी 1667 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 20 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1647 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची चिंता कोरोना मृत्यूमुळे वाढली आहे. बुधवारी 4, गुरुवारी 2, शुक्रवारी 2 तर शनिवारीही 2 मृत्यूची नोंद झाली आहे.
(2 deaths in Beed district on Saturday; See the number of new corona infestations.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-4, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-4, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-1, वडवणी-3 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत आज मोठी घट झाली आहे. मात्र कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि.6) 4, गुरुवारी (दि.7) 2, शुक्रवारी 2 व शनिवारी 2 कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांनी जीव गमावला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल 10 कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2784 झाली आहे.
दरम्यान, राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण (Corona Positive) सापडले असून 44 रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे. अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये आज 340 रुग्ण आढळले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही आकडा वाढल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज 162 रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यातही 102 बाधित रुग्णांची आज नोंद झाली असून पुण्यात 264 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेषत: या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर मुंबई आणि सर्व उपनगरांमध्ये मिळून 978 कोरोना बाधित रुग्ण आज सापडले आहेत.