आश्चर्य … आढळला दुसरा “मॅग्नेटीक मॅन”; शरीर चुंबक बनल्याचा आणखी एक प्रकार.

नाशिक दि.11 जून – काल नाशिक येथील सिडको भागात राहणारे अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू चिटकत असल्याचे समोर आल्यानंतर चांगलीच चर्चा झाली. सिडकोपाठोपाठ आता नाशिकच्याच अंबड परिसरातील एका 61 वर्षीय कंपनीमालक व निमाच्या कमिटी मेंबरने कोव्हिशील्ड (Covishield) लशीचा दुसरा डोस घेऊन दोन महिने झाले असतानाही त्यांच्या अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला असून, त्यांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

(Surprise … found another “magnetic man”; Another form of body becoming a magnet.)

नाशिकच्या अंबडमधील महालक्ष्मीनगर भागातील रहिवासी नानासाहेब देवरे (वय 61) यांनी 10 एप्रिलला कोव्हिशील्ड (Covishield) लशीचा दुसरा डोस घेतला. तब्बल दोन महिन्यांनंतर आता 10 जूनला त्यांच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले.

“मॅग्नेटीक मॅन” ला बघण्यासाठी गर्दी
कंपनीत बसलेले असतानाच त्यांनी हा प्रयोग करून बघितला. कामगारांच्या जेवणाचे डबे, चमचे व कॉइन लावून बघितले तर खरोखर हाताला, छातीला, पाठीला, कपाळाला व गालालाही या सर्व वस्तू चिकटल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे कामगारांमध्ये एकच चर्चा रंगली. त्यानंतर ते घरी आले. घरी हा प्रयोग कुटुंबासोबत केला, तर खरोखर सर्व वस्तू चिकटत होत्या. याबाबत परिसरात एकच चर्चा रंगली. परिसरातील लोकही तो प्रयोग (magnetic man) बघण्यासाठी गर्दी करू लागले.

पहिला प्रकार सिडकोत
नाशिकच्या सिडको भागात राहणारे 72 वर्षीय अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने सर्वप्रथम आढळून आले. विशेष करून सोनार यांनी कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर हा प्रकार त्यांच्याबाबतीत घडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

लस घेतल्यानंतर धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकल्या
अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. याचा व्हीडीओ सोशल मिडियात (social media) व्हायरल झाल्यावर या प्रकरणी माध्यमांचे लक्ष वेधले. यावेळी कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccine) घेतल्यावर शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या असे सोनार यांनी सांगितले. यावेळी सोनार यांनी धातूच्या वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून सुध्दा दाखवल्या.

दोन्ही प्रकारात साम्य
दरम्यान, नाशिक मधील सिडको व अंबडमध्ये आढळून आलेल्या “मॅग्नेट मॅन” मध्ये अनेक गोष्टीत साम्य आहे. शरीरावर धातूच्या वस्तू चिटकत असल्याचे दोन्ही प्रकारात दिसत आहे. तसेच या दोन्ही व्यक्तींनी कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा केला आहे.

चौकशी पुर्वीच दुसरा प्रकार आला समोर
काल सिडकोच्या प्रकार माध्यमातून समोर येताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. यासोबतच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीनेही याप्रकाराची दखल घेतली. या पहिल्या प्रकाराचे कारण अद्याप समोर आलेले नसताना दुसरा प्रकार समोर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!