आश्चर्य… दगडांची तस्करी; बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दगड चीनमध्ये.

औरंगाबाद दि.17 जुलै – बीड (Beed), औरंगाबाद व जालना जिल्ह्यात आढळून येणाऱ्या सेमी प्रेसियस स्टोन्स (Semi Precious Stones) या दगडाची थेट चीनमध्ये तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील तस्करांमार्फत चीनमधील व्यापारी औरंगाबादेत (Aurangabad) किंवा गुजरातेतील खंबात शहरात येवून या दगडाची खरेदी करत आहेत. याप्रकरणी जिल्हा गौण खनिज अधिकारी अतुल दौंड, तहसीलदार निखिल धुळधर यांच्या नेतृत्वातील दोन पथकांनी छापेमारी सुरू केली आहे.

(Surprise … smuggling of stones; Stones in Beed, Aurangabad and Jalna districts in China.)

जगभरात कोण कशाची कशासाठी तस्करी करेल याचा काहीही नेम नाही. कारण, आपल्या सामान्य लोकांसाठी खूप सामान्य वाटणारी एखादी गोष्ट जागतिक बाजारात खूप मौल्यवान असू शकते हे आता समोर आले आहे. मराठवाड्यात आढळणारा सामान्य दगड सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा दगड परदेशात मौल्यवान ठरत असल्याचे समोर आले आहे.

सेमी प्रेसियस स्टोन्स (Semi Precious Stones) हा दगड बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सापडतो. त्याला चीनमध्ये (China) मोठी मागणी आहे. या दगडाची तस्करी करणारे एक रॅकेट (Racket) सध्या मराठवाड्यात सक्रीय झाले आहे. या रॅकेटची पाळेमुळे खोडून काढण्याचे आव्हान महसूल विभागावर आले आहे. मात्र, महसूल विभागाची एकूण ख्याती लक्षात घेता यामध्ये त्यांचाच थेट सहभाग असू शकतो किंवा अगदी बड्यांचा सहभाग असल्यावर हा विभाग हातावर हात देऊन बसून अर्थपूर्ण पद्धतीने शांत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे एका व्यक्तीने मुंबईतून तक्रार दिल्याने हे प्रकरण उघडकीस आलेले आहे. औरंगाबादसह बीड, जालना, जळगाव भागात एका राजकीय कुटुंबातील व्यक्तीतर्फे काही अधिकारी व गुंडांना हाताशी धरून हे रॅकेट (Racket) चालवले जाते. तक्रार प्राप्त होताच महसूलच्या पथकांनी दोन ठिकाणी छापे टाकून दगडांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

डोंगरात जेसीबीने खोदकाम करून हा दगड काढून विकला जातो. या दगडाची चीनमध्ये तस्करी करणारी एक टोळी सक्रिय असल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. मुंबईतील तस्करांमार्फत चीनमधील व्यापारी औरंगाबादेत किंवा गुजरातेतील खंबात शहरात येवून या दगडाची खरेदी करतात. जिल्हा गौण खनिज अधिकारी अतुल दौड, तहसीलदार निखिल धुळधर यांच्या नेतृत्वातील दोन पथकांनी छापेमारी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!