पुन्हा बिबट्याची दहशत… नेकनूरजवळ एका शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; बीड, केज व धारुर तालुक्यात सतर्कता.

नेकनूर दि.11 जून – नेकनूरजवळ असलेल्या कळसंबर गावातील उसाच्या शेतात वाघ असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आल्याने अनेकांनी गर्दी केली होती. नंतर पोलिसासह (Police) वन विभागाची (Forest department) टीम घटनास्थळी आल्यानंतर तो बिबट्या (Leopard) असल्याचे उघड झाले. (Leopard terror again … Leopard attack on a farmer near Neknur; Vigilance in Beed, Kaij and Dharur talukas.)
सदरील बिबट्या (Leopard) जैतळवाडीच्या दिशेने गेला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या बिबट्याने शेतातून घराकडे जात असलेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला असून सदर जखमी शेतकऱ्यावर बीड (Beed) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला बघता बघता या ठिकाणी गावातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच एपीआय लक्ष्मण केंद्रे, पोलीस (Police) कॉन्स्टेबल खाडे, खांडेकर, डोंगरे यांनी धाव घेऊन शेतातील नागरिकांना दूर केले.
सुरुवातीला वाघ असल्याचे बोलले गेले मात्र वन विभागाचे (Forest department) वनाधिकारी अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडे, दाखल झाले त्यांनी तो बिबट्या असल्याचे ओळखले. मात्र हा बिबट्या हुलकावणी देत बाजूच्या जैतळवाडीच्या दिशेने पळाला. कळसंबर शिवारात शेतातून घरी जाताना आजिनाथ वाघमारे (वय 40) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
गतवर्षी कोरोनातून सावरलेल्या बीड व अहमदनगर जिल्ह्यातील सिमाभागात नरभक्षक बिबट्याने थैमान घातले होते. बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यात त्यावेळी मोठी दहशत होती. पाच दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. दोन महिन्यापुर्वीही आष्टी तालुक्यात बिबट्या आढळून आला होता. आज थेट नेकनूर परिसरात बिबट्या आढळल्याने लगतच्या बीड, केज, धारुर व पाटोदा तालुक्यातील शेतकरी व नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.