धारुर येथील सय्यद कलीम यांचे अल्पशा आजाराने निधन.

किल्लेधारूर दि.1 अॉगस्ट – धारुर येथील सय्यद कलीम यांचे अल्पशा आजाराने आज दि.1 सोमवारी त्यांच्या निवासस्थानी सांयकाळी 5 वाजता निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
(Syed Kalim of Dharur passed away after a brief illness.)
धारुर (Dharur) शहरातील दुधियापुरा भागातील रहिवासी सय्यद कलीम उस्मान (वय 67) हे शहरातील शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. ते मुस्लिम समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. नगर परिषदेचे माजी सभापती सय्यद हारुण यांचे ते ज्येष्ठ चूलत बंधू होत. गेल्या महिन्यात चक्कर आल्यानंतर त्यांच्यावर अंबाजोगाई व औरंगाबाद (Aurangabad) येथे उपचार सुरु होते.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. शहरातील सागर मेटर्सचे तरुण व्यापारी सय्यद रहीम यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सय्यद परिवाराच्या दुःखात बीड24 परिवार सहभागी आहे. त्यांच्यावर मिल कॉर्नर, कासार तलावावरील कब्रस्तानमध्ये दि.2 अॉगस्ट मंगळवारी सकाळी 9 वाजता दफनविधी करण्यात येणार आहेत.