कोरोंना विशेष

रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांची ऑन द स्पॉट अँटीजन टेस्ट; प्रशासनाची अनोखी शक्कल.

नाशिक दि.12 एप्रिल – राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी व वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. तरीही विनाकारण काही नागरिक बाहेर फिरतांना दिसतात. त्‍यांच्‍यावर अंकुश ठेवण्‍यासाठी मनमाड पोलिस, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट अँटीजन टेस्ट (Antigen Test) करण्याची मोहिम सुरु केली.

(On-the-spot antigen test of pedestrians; The unique shape of the administration.)

मला काही होत नाही, कोरोना बिरोना काही नाही, किती भेतोस, काही होत नाही, असं म्हणणाऱ्यांची बरीच संख्या ठिकठिकाणी आहेच. या लोकांचा त्रास प्रशासनावर पडत असतो. अशा लोकांत अनेक वेळा लक्षणे नसणारी कोरोना बाधितही असू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग होवून कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढते. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी मनमाड येथील पोलिस, आरोग्य व पालिका प्रशासनाने अनोखी शक्कल लडवली.

सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. मनमाडमध्ये सडक सख्याहरींसाठी स्थानिक प्रशासनाने विशेष मोहिम आखली आहे. नियमभंग करुन विनाकारण फिरणार्‍यां लोकांना मनमाड पोलिस, पालिका आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पकडले. त्‍यांची थेट ऑन द स्पॉट त्यांची अँटीजन टेस्ट (Antigen Test) करण्‍यात येत आहे. कोरोना पॉझिटीव्‍ह (Corona Positive) आलेल्‍यांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे.

येवढेच नाही तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनोख्या कारवाईमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, असे मत मनमाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पालिका मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!