धारुर पोलिस हद्दीत धाडसी चोरी; पोलिस घटनास्थळी दाखल.

किल्ले धारूर दि.26 फेब्रुवारी – धारुर (Dharur) पोलिस ठाणे हद्दीतील आडस येथे एका दुकानाचे शटर उचकून धाडसी चोरी (Daring theft) झाल्याचे उघडकीस आले असून धारुर पोलिस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. (API) व्हि.एस. आटोळे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
( Daring theft at Dharur police precinct; Police rushed to the spot.)
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार पोलिस ठाणे हद्दीतील आडस येथील धारुर रस्त्यावरील बालाजी कलेक्शनचे शटर वाकवून शुक्रवारी (दि.25) मध्ये रात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले. यामध्ये नेमकं काय व किती चोरी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच धारुर पोलिस (Police) घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
दुकानात रात्री पार्टी येणार असल्यानं मोठी रोख रक्कम ठेवली असल्याचे कळते. चोरीत नगदी व रोख ऐवज चोरट्यांनी पळवला का नाही ते पोलिस पंचनाम्यांनतर उघड होणार आहे. मात्र या चोरीच्या प्रकारानंतर आडस येथील व्यापारी चिंतेत आहे.
एका प्रत्यदर्शी वृद्धांने सांगितले की, पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास चौघे दुकान उघडत होते परंतु संशय न आल्याने त्यांना हटकले नाही. हे दुकान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर आहे. तरीही ते फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आडस गावात नियमित चोरीच्या घटना घडत असून एकाही घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही. तसेच मोठ्या बाजारपेठेचे गाव असून ही येथे केवळ दोन पोलीस कर्मचारी तेही दिवसाचं असतात रात्रीची गस्त बंद असल्यामुळे चोरट्यांना मोकळं रान मिळतं आहे. सतत चोरीच्या घटना घडत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद असलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे सुरु करण्याची मागणी होत आहे.