कोरोंना विशेष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण

वाशिंग्टनः- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) व त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना करोनाची (corona) लागण झाली असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली. या आधी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या  नजीकच्या  सहकाऱ्यास कोरोना (corona) ची लागण झाल्यानंतर त्यांची  कोरोना (corona) चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे, “मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड (covid-19) पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू”. यामुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता जात वर्तवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!