एमडिएच मसाला चे मालक ‘पद्म भूषण’ गुलाटी यांचे निधन

मुंबई दि.03:- एमडिएच (MDH) मसाला (Masala) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी (Gulati) यांचं आज पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी त्यांना 2019 मध्ये ‘पद्म भूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. 15 कारखाने आणि 1000 डिलर्सचं जाळं असलेल्या ‘एमडीएच’ (MDH) मसाला (Masala) कंपनीची ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्या वर आहे. केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी (Gulati) यांनी 2017 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. वयाच्या ९८ व्या वर्षी गुलाटी यांच निधन झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!