कोरोंना विशेष

धारुर तालुक्यातील कोरोना अपडेट; पहा काय आहे परिस्थिती

किल्लेधारूर दि.१ सप्टेंबर- शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची शृंखला सुरु असून आजपर्यंत १६४ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या येथील विलगीकरण कक्षात ३३ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी दिली.

दि.३१ जुलै पासुन दररोज तालुक्यात कोविड-१९ ची रुग्ण आढळून येत आहेत. शहरात पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत तालुक्यात १६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११५ रुग्ण बरे होवून परतली आहेत. सध्या ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ३३ रुग्ण धारुर येथील विलगीकरण कक्षात तर १५ रुग्ण इतरत्र आहेत. ४ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. एकुण रुग्णां पैकी ७ रुग्ण दगावली आहेत. आजपर्यंत तालुक्यातून १९०५ लोकांची थ्रोट स्वॅब तपासणी तर १३८ जनांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली आहे. धारुर कोविड केअर सेंटरमधून यापैकी १५०९ स्वॅब घेण्यात आली असून आज २५ स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!