बेकारीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) डीएड करुनही नौकरी लागतं नसल्याने ३२ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना धारूर तालूक्यातील आसरडोह येथे २७ डिंसेबर रोज रविवारी सकाळी घडली. या घटने मुळे हळहळ व्यक्त केली जात असून धारूर पोलीस (Police) स्टेशनला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

बारावी नंतर डीएड अन् शिक्षक म्हणून नौकरी पक्की असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. त्यामुळे धारुर तालुक्यातील आसरडोह येथील बाळासाहेब ज्ञानदेव काजगुंडे (३२) या तरुणाने डी एड केले. पण काहीच वर्षा पासून शासनाने डीएड च्या जागाच न भरल्याने हा तरुण नौकरीच्या प्रतिक्षेत होता. शिक्षण घेऊनही नौकरी लागतं नसल्याने आणि काही काम करता येत नाही. या नैराश्यातून बाळासाहेब काजगुंडे याने रविवारी सकाळी रहात्या घरात माळवदाच्या हळकडी ( हुक) यास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सदरील घटनेची आडस येथील पोलीसांना (Police) माहिती होतांच पो.कॉ. तेजस ओव्हाळ यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. धारुर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. बाळासाहेब काजगुंडे यांच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!