बीड जिल्ह्याची आजची कोविडस्थिती; केंद्रीय आरोग्य पथकाकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी.

बीड दि.8 एप्रिल – गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संक्रमण वाढले असुन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या झपाट्याने वाढत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात स्थिती स्फोटक झालेली असून राज्यभरात केंद्रीय आरोग्य पथकाकडून कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. आज सकाळी बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकातील (Central Health Squad) सदस्याचे आगमन झाले असून बीड शहरात पथकाने अनेक ठिकाणी भेटी दिल्या.

(The current state of Beed district; Inspection at District Hospital by Central Health Squad.)

महाराष्ट्रात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. वाढती कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा प्रशासनाची चिंता वाढवत आहे. याची दखल घेत राज्यभरात आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य पथकात दोन सदस्य आहेत. यात डॉ.रक्षा कुंदल व डॉ. अरविंद कुशवाह यांचा समावेश आहे. जिल्ह्यात चार दिवस केंद्रीय आरोग्य पथक कोविडस्थितीचा आढावा घेणार आहे.

आज सकाळी दोन सदस्यांपैकी एक दिल्ली एम्स रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. रक्षा कुंदल बीडमध्ये दाखल झाल्या. त्यांनी आज दुपारी जिल्हा रुग्णालयात भेट देवून कोविड वार्डात फेरफटका लावला. यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार पध्दती, औषध पुरवठा याची पाहणी करत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचे व नियोजनाचे कौतूक केले.

यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते, अप्पर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, बीडचे तहसीलदार शिरिष वमने उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य पथक पुढील चार दिवस जिल्हाभराचा दौरा करणार आहे. विविध कोविड सेंटरला भेटी देत तेथील रुग्णांशी, आरोग्य कर्मचाऱ्यांशी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सध्या जिल्ह्याची स्थिती
आज जिल्ह्यातील 306 रुग्णांची कोरोनावर मात.
आज जिल्ह्यात 711 नवीन कोरोनाबाधितांची भर.
जिल्ह्यातील एकुण बाधित -29782
जिल्ह्यात एकुण मृत्यू – 685
जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट- 10.31%
जिल्ह्याचा डेथरेट – 2.30%
जिल्ह्याचा डबलिंग रेट-332.2
जिल्ह्याचा कॉन्टॕक्ट ट्रेसिंग रेषो-15.69
कॉन्टॕक्ट ट्रेस्ड – 467378
रिकव्हरी रेट- 87.93
उपचार घेत असलेले रुग्ण – 2909

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!