आज २६ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; अर्धा जिल्हा लॉकडाऊन

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) शहरातील २६ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.

शहरात गेल्या नऊ दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. यामुळे सर्वांचेच लक्ष येणाऱ्या अहवालाकडे लागले आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत २६ सहवासितांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. काल शहरालगतच्या ग्रामीण भागात दोन पॉझिटीव्ह रुग्ण सापडली आहेत. यासह एकुण १७ ॲक्टीव रुग्ण आहेत. यामुळे धारुरकरांची धाकधूक सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यानी स्वंयस्फुर्तिने कडकडीत बंद पाळला आहे. दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टीसह माजलगाव दहा दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश काढले आहेत. नवीन रुग्ण आढळल्यास उर्वरित तालुक्यातही हा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!