हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

बीड दि.२७- सावरगांव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्सचे कारण पुढे करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे Pankaja Munde यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हयासह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांचेवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता माझ्यापर्यंत आलं आहे असं ट्विट पंकजाताई मुंडे Pankaja Munde यांनी केलं आहे तर पंकजाताईंवरील गुन्हा हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट असल्याची प्रतिक्रिया खा. डाॅ. प्रितमताई मुंडे Pritam Munde यांनी व्यक्‍त केली आहे.

सावरगांव येथे काल पंकजाताई मुंडे यांचा ‘आपला दसरा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्यात सोशल डिस्टन्सचे कारण पुढे करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे Pankaja Munde यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हयासह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गोरगरीब ऊसतोड कामगार आणि राज्यातील कष्टकरी वंचितांचा ऊर्जास्थान असणारा मेळावा रोखण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरल्यामुळे नैराश्य आलेल्या विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचेवर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा केवळ राजकीय जळफळाट आहे असे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे Pritam Munde यांनी म्हटले आहे.

पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी सारखाच यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला प्रतिसाद मिळू नये म्हणून पाण्यात देव घातलेल्या लोकांची या मेळाव्याने पायाखालची वाळू सरकली आहे. कोरोना महामारीच्या संकटात देखील भक्ती आणि शक्तीची परंपरा ऑनलाइन मेळाव्याच्या माध्यमातून जोपासली गेली आणि पंकजाताईंचे म्हणने लाखो लोकांपर्यंत पोहोचले हीच विरोधकांची खरी पोटदुखी आहे. मेळावा रोखण्यास आलेल्या अपयशामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे खा.डॉ.प्रितमताई मुंडे Pritam Munde यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!