दुर्दशा… स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी, तरी रस्ता नाही; धारुर तालुक्यातील लिमला गावची दैना.

किल्लेधारूर दि.21 जानेवारी – देशाला स्वातंत्र्य (freedom) मिळून तब्बल पंच्याहत्तर वर्ष उलटले. मात्र आजही धारुर (Dharur) तालुक्यातील लिमला या गावाला जोडणारा पक्का रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना पायपिट करावी लागत असल्याचे दिसत आहे.
(Seventy-five of freedom, though no road; Tragedy of Limla village in Dharur taluka.)
धारूर तालुक्यात लिमला ते देवठाणा अवघ्या तीन किलोमीटरचा हा रस्ता (road) बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे हा रस्ता चिखली, देवठाणा व मुंगी या गावाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला बैलगाडी घेऊन जाणे देखील मुश्कील आहे. तसेच तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचा हा जोड रस्ता आहे.
येथून वाहणाऱ्या गुणवरा नदी पात्रातून ग्रामस्थांना मार्ग काढावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. तर अनेक शेतकरी शेतात निवासी आहेत. यामुळे पक्क्या रस्त्याची नितांत गरज आहे. चारचाकी सोडा निट दुचाकीही या रस्त्यावर चालवता येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. अतिशय दुर्गम असलेल्या याभागातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासुन रस्त्याची मागणी करत आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आल्या की आश्वासनाची खैरात दिली जाते. मात्र विविध पक्षातील नेते मतदान झाल्यानंतर या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष करतात. यामुळे चिखली, देवठाणा व मुंगी या भागातील ग्रामस्थांची रस्त्याविना मोठी गैरसोय होते.
एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावल्याचे सांगितलं जात असताना धारुर सारख्या दुर्गम भागात अजूनही विकास रखडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. चार गावांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नवनाथ गवळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.