उद्या पासुन साडेसात संध्याकाळी साडेसहा पर्यंत चालु राहतील व्यवसाय

केशकर्तनालय राहणार सुरु

बीड दि.२५ (वार्ताहर) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज बीड जिल्ह्यासाठी नवे आदेश जारी केले आहेत. विविध व्यवसाय व उद्योगांच्या कामकाजा विषयीचे यापुर्वीचे लॉकडॉऊन काळातील सर्व आदेश अधिक्रमीत करत उद्या पासुन केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरसह इतर व्यवसाय ७.३० ते संध्याकाळी ६.३० यावेळेत तर  बँका शासकीय वेळेप्रमाणे सुरु राहणार  असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

नव्या आदेशात केवळ खालील बाबी पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधीत असतील.
सर्व विमानेसवा, शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, शिकवणी केंद्र बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण चालू राहील त्यास प्रोत्साहन देण्यात येईल. सरकारी कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अडकलेले व्यक्ती, प्रवासी, अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्ष, बसस्थानक, व रेल्वे स्थानकातील हॉटेल उपहारगृह वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणार्‍या अस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सूट देण्यात येत आहे.
सर्व हॉटेल ढाबे, चाट सेंटर, खानावळींना केवळ घरपोहोच सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे. सर्व सिनेमागृहे, मॉल, व्यायामशाळा, जलतरणिका, मनोरंजन, उद्याने, प्रेक्षागृहे सभागृहे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य व जमावास बंदी राहील. सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक परिषद, संमेलने जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. क्रिडा संकूले, क्रिडांगणे व सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक, सामुहिक क्रिडा, व्यायाम, कृतिंना परवानगी नाही. केशकर्तनालय, ब्यूटीपार्लर व तत्सम दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंट पाळणे बंधनकारक करत व पाच पेक्षा जास्त ग्राहकांना एकत्र जमण्यास मज्जाव कायम राहणार आहे. शासकीय नियमाप्रमाणे सर्व बँका सुरु राहतील असे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!